छात्र भारतीचे ४२ वे राज्य अधिवेशन मुंबईत उत्साहात संपन्न; विद्यार्थी प्रश्नांवर सखोल मंथन
छात्र भारतीचे ४२ वे राज्य अधिवेशन मुंबईत उत्साहात संपन्न; विद्यार्थी प्रश्नांवर सखोल मंथन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे ४२ वे राज्य अधिवेशन दिनांक २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी शहीद भगत सिंग मैदान, अभ्युदयनगर, काळाचौकी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात विद्यार्थी चळवळ, शिक्षणव्यवस्था, सामाजिक प्रश्न, अर्थकारण आणि सांस्कृतिक जाणीव यांवर सखोल चर्चा झाली.
शनिवार, २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी उद्घाटन सत्राला प्रारंभ झाला. यावेळी शहीद भगत सिंग यांच्या पुतळ्यास सलामी देण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. अहिल्या विद्या मंदिर (इंग्रजी) येथील विद्यार्थी बँड पथकाने आकर्षक संचलन सादर केले. उद्घाटन सत्रात पद्मश्री डॉ. जहीर काझी (अध्यक्ष, अंजुमन-ए-इस्लाम), समाजवादी नेते मा. कपिल पाटील, अजित शिंदे (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल) आणि राजा कांदळकर (अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज हातेकर (अझीम प्रेमजी विद्यापीठ) यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे अध्यक्षपद रोहित ढाले (अध्यक्ष, छात्र भारती) यांनी भूषविले.
दुपारच्या सत्रात साहिल दरणे यांनी ‘रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत’ हे प्रभावी सादरीकरण केले. “आवाज तरुणाईचा” या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादात एलिजाह इमॅन्युएल (पर्यावरणवादी कार्यकर्ता), सायली पावस्कर (रंगकर्मी, थिएटर ऑफ रेलेव्हन्स) आणि अतुल पाटील (माजी अध्यक्ष, टीआयएसएस विद्यार्थी संघ) सहभागी झाले.
संध्याकाळी महाराष्ट्राचे युवा अभिनेते पृथ्वीक प्रताप यांच्याशी संवाद साधण्यात आला. प्रा. संजीव चांदोरकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी आणि अर्थकारण या विषयावर चर्चा झाली. युवकांच्या सहभागातून गीत-रॅप सादरीकरण झाले. तसेच माही जी आणि ब्रिगेडियर यांचा कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर ‘छात्र भारतीची पुढील वाटचाल’ या विषयावर संवाद झाला. या सत्रात रोहित ढाले, अनिकेत घुले, सचिन काकड, विशाल शिंदे, दीप्ती शेलार, तुकाराम डोईफोडे, देविदास हजारे, प्रफुल्ल कांबळे, संदीप जाधव, प्रांजली आरोटे, राहुल जन्हाड, प्रशांत खंदारे, सौरभ शिंपी, आदेश मगर, प्रकाश पाटील, चेतना अमृतकर, शर्वरी सरदार, ओम तांगडेपाटील, साहिल दरणे, गणेश पवार, भूषण पाटील, राज माळी आणि समीर देशमुख सहभागी झाले. या सत्रास राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी समारोप सत्र झाले. अधिवेशन अहवाल आणि ठरावांचे वाचन करण्यात आले. छात्र भारती सन्मान सोहळा पार पडला. अध्यक्षांचे मनोगत झाले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनाला जयवंत पाटील, अशोक बेलसरे, चंद्रकांत म्हात्रे, डॉ. कैलास गौड, उदय पवार, रमाकांत बने, मधु परांजपे, शिवाजी खैरमोडे, दिलीप खोंड, अरविंद सावला, सुभाष मोरे, मारुती शेरकर, शशी करपे, प्रवीण दाभोळकर, रंगा सातवसे, शरद गिरमकर, दीपक सोनवणे, शेखर सत्रे, ताप्ती मुखोपाध्याय, अरुण लावंड, नंदा कांबळे, कल्पना शेंडे, अमित झा, अजित वाघमारे, राधिका महांकाळ, राजेश मोरे आणि नवनाथ पाटील उपस्थित होते.
अधिवेशनात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अनिकेत घुले अध्यक्ष, सचिन काकड कार्याध्यक्ष, विशाल शिंदे संघटक, प्रशांत खंदारे सचिव, दीप्ती शेलार युवती संघटिका आणि तुकाराम डोईफोडे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. समाजसेवक व उद्योजक उदय अशोक पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई फिल्ड विजिट आयोजित करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर आणि एशियाटिक लायब्ररी यांचा समावेश होता. या अधिवेशनातून छात्र भारतीने विद्यार्थी नेतृत्व घडवणे, संघटनात्मक बळकटी वाढवणे आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर