प्रभाग क्रमांक २०५ मध्ये जान्हवी राणेंची घोडदौड; ‘नारळ’ निशाणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग क्रमांक २०५ मध्ये जान्हवी राणेंची घोडदौड; ‘नारळ’ निशाणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : प्रभाग क्रमांक २०५ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या जान्हवी जगदीश राणे (निशाणी : नारळ) या सध्या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. जनतेचा वाढता विश्वास, घराघरांतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद तसेच महिलांसह सर्व घटकांकडून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा यामुळे प्रभागात जान्हवी राणे यांची उमेदवारी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या, महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरलेल्या आणि सामान्य नागरिकांचा आवाज बनलेल्या जान्हवी राणे यांना यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. मात्र, “जनतेचा विश्वास हाच माझा पक्ष” या भूमिकेतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, तो निर्णय नागरिकांनी सकारात्मकपणे स्वीकारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची अवस्था, महिला सुरक्षा, गरजू नागरिकांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी कोणताही गाजावाजा न करता कार्य करणाऱ्या जान्हवी राणे यांची प्रतिमा ही प्रामाणिक, पारदर्शक आणि कायम जनतेत राहणाऱ्या नेत्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच प्रचारादरम्यान “पदासाठी नाही, तर जनतेसाठी” ही त्यांची भूमिका नागरिकांच्या मनाला भिडताना दिसत आहे.
त्यांची निवडणूक निशाणी ‘नारळ’ ही केवळ चिन्ह न राहता प्रभागात विश्वासाचे प्रतीक बनत चालली आहे. शुभारंभ, पवित्रता आणि यशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या नारळाच्या माध्यमातून प्रभागाचा विकास सुरक्षित आणि जबाबदार हातात जाणार असल्याची भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य कुटुंबे मोठ्या संख्येने जान्हवी राणे यांच्या प्रचारात सहभागी होत असून, “आपलीच माणूस, आपलीच उमेदवार” असा सूर प्रभागात ऐकू येत आहे. अपक्ष उमेदवार असूनही मिळणारा हा वाढता पाठिंबा इतर उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे चित्र आहे.
निवडून आल्यास प्रभाग क्रमांक २०५ मध्ये विकासकामांना गती देणे, स्वच्छता व्यवस्था सुधारणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, दर्जेदार रस्ते उभारणे, महिला सुरक्षेला प्राधान्य देणे तसेच तरुणांसाठी संधी निर्माण करण्याचा ठाम संकल्प जान्हवी राणे यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २०५ मध्ये ‘नारळ’ निशाणीभोवती नागरिकांचा वाढता विश्वास आणि प्रतिसाद आगामी निवडणुकीत कोणती दिशा घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर