मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा
मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा
मुंबई - मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (एसईसी) आणि बीएमसीने नागरिकांना मतदार यादीत आपले नाव योग्यरीत्या नोंदले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. नाव किंवा ईपीआयसी (मतदार ओळखपत्र) क्रमांकाच्या आधारे एसईसी पोर्टल किंवा पालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तपासणी करता येणार आहे. मतदार यादीत नाव न सापडल्यास किंवा नोंदीतील तफावत दूर करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
टप्पा १ : अधिकृत पोर्टलला भेट द्या
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार शोध पोर्टलला भेट द्या -mahasecvoterlist.in किंवा पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (mcgm.gov.in) ‘Election’ विभागातूनही प्रवेश करता येईल.
टप्पा २ : शोधण्याची पद्धत निवडा
या पोर्टलवर तपशील शोधण्यासाठी दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत –
नावाने शोधा : पहिले नाव, आडनाव आणि विधानसभा मतदारसंघ भरा.
ओळखपत्र क्रमांकाने (EPIC) शोधा : जलद आणि अचूक निकालासाठी मतदार ओळखपत्र क्रमांक टाका.
टप्पा ३ : आवश्यक तपशील भरा
नावाने शोध घेत असाल तर योग्य जिल्हा (मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर) आणि संबंधित विधानसभा मतदारसंघ निवडा. नाव समान असल्यास वडिलांचे किंवा पती/पत्नीचे नाव टाकल्यास शोध अधिक अचूक होतो.
टप्पा ४ : प्रभाग व मतदान केंद्राची खात्री करा
तुमचे नाव दिसल्यानंतर प्रणाली पुढील माहिती दर्शवेल :
मतदार अनुक्रमांक
प्रभाग क्रमांक
मतदान केंद्राचे ठिकाण (इमारत किंवा खोली क्रमांकासह)
टप्पा ५ : माहिती जतन/डाऊनलोड करा.
मतदार स्लिपचा स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रिंट काढा. ही स्लिप स्वतंत्र ओळखपत्र नसली तरी मतदान केंद्रावर प्रक्रिया जलद होण्यास मदत होते.
महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक
मतदार यादीत नाव न सापडल्यास किंवा नोंदीत तफावत आढळल्यास खालील हेल्पलाइनवर संपर्क साधा :
केंद्रीय हेल्पलाइन: १९१६
पालिका निवडणूक कक्ष : ०२२-२२७५४०२८ / ९६१९५१२८४७
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant