डोंबिवलीतील पैसे वाटपावरुन तुफान राडा!
डोंबिवलीतील पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात युती आहे. मात्र, त्यांच्यातील संबंध यापूर्वीच ताणले गेल्याचे परिणाम वारंवार दिसत आहेत. सोमवारी (12 जानेवारी) शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे चारजण जबर जखमी झाले. जखमींमध्ये भाजपचे ओमनाथ नाटेकर आणि शिवसेनेचे नितीन पाटील यांच्यासह चौघे जखमी झाले आहेत.
डोंबिवलीमधील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतरही त्यांच्यात युती झाली असली तरी मन दुभंगलेलीच आहेत. याची प्रचिती रविवारी आणि सोमवारी रात्री आली. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये युती नाही. कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिवसेनेचे (शिंदे) चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवाराने रविवारी (11 जानेवारी) केला होता. भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडल्याचा दावाही करण्यात आला होता. यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राडा झाला.
त्यानंतर सोमवारी (12 जानेवारी) रात्री डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार राडा झाला. भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील हेदेखील जखमी झाले आहेत. जबर जखमी झालेल्या ओमनाथ नाटेकर यांच्या डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant