जळगावात शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप
जळगावात शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप
जळगाव- राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल. मात्र, प्रचार पत्रके वाटण्यास मनाई आहे. अशातच काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. जळगावमध्येही मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावं, यासाठी जळगावमधील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे संतोष पाटील आणि ललित कोल्हे यांच्या वतीने मतदार महिलांना पैसे वाटप केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत कैलास हटकर या अपक्ष उमेदवाराने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता पुन्हा त्यांनी महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप करत तसा व्हिडीओ देखील सोशल मिडियामध्ये व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.
महिलाना डांबून ठेवल्याचा आरोप करत व्हिडीओ व्हायरल - जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष मोतीराम पाटील आणि कारागृहात असलेल्या ललित कोल्हे यांच्यासाठी हे पैसे वाटले जात असल्याच्या आरोप केले होते. यानंतर महिलाना डांबून ठेवल्याचा आरोप देखील विरोधी उमेदवार कैलास हटकर यांनी केला आहे. तशा स्वरूपातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर वायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या काळात विरोधक हे आरोप करणारच... - या सगळ्याच्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीच्या काळात विरोधक हे आरोप करणारच आहेत. ज्या महिलांना पैसे वाटप केल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला त्या महिला आपल्याकडे बचत गटाच्या काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांची मजुरी वाटप केले जात असताना विरोधकांच्याकडून हा व्हिडिओ वायरल करण्यात आला आणि पैसे वाटप केल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. मोठ्या संख्येने या महिला आल्या होत्या, त्यांच्या आपसात वाद निर्माण होऊ नये ,यासाठी त्यांना थोड्या थोड्या संखेने बाहेर सोडण्यात आले. मात्र त्यांना कोंडून ठेवले आणि पैसे वाटप केले यात सत्यता नाही. कोणताही सुशिक्षित उमेदवार आपल्या घरी बोलून एवढ्या संखेने महिलाना पैसे वाटप करणार नाही अस सांगत सरिता कोल्हे यांनी त्यांच्या उमेदवारांच्या वर होणारे आरोप हे फेटाळून लावले आहेत.
शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार ललित कोल्हे यांच्या पत्नी या संदर्भात अपक्ष उमेदवाराने आपल्या कडे प्रत्यक्ष भेटून तकार केली होती. या तक्रारीच्या आधारे आपण ती मनपा आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे पाठविण्यात आली आहे. पुढील कारवाई त्यांच्या मार्फत होऊ शकणार असल्याच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी म्हटल आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर