महानगरपालिका रणधुमाळीत जनहित लोकशाही पक्षाचा शिंदेंना जाहीर पाठिंबा; 29 महानगर पालिके मध्ये शिवसेनेला ताकद
महानगरपालिका रणधुमाळीत जनहित लोकशाही पक्षाचा शिंदेंना जाहीर पाठिंबा; 29 महानगर पालिके मध्ये शिवसेनेला ताकद
मुंबई | प्रतिनिधी
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. जनहित लोकशाही पक्षाने शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत महापालिका निवडणुकीत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी, मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन, नरिमन पॉईंट येथे झालेल्या बैठकीत जनहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अशोकराव आल्हाट यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकमताने शिवसेनेला जाहीर पाठिंबा घोषित केला.
या निर्णयानुसार, शिवसेना प्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्षाचे अधिकृत सचिव मा. संजय मोरे व मा. प्रशांत शिंदे यांच्या हस्ते पाठिंब्याचे अधिकृत पत्र स्वीकारण्यात आले. या प्रसंगी मा. आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह विविध समाजघटकांचे नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेल्या चर्चेत जनहित लोकशाही पक्षाचे प्रमुख मा. अशोकराव आल्हाट यांनी शिवसेनेचे प्रवक्ते मा. राजू वाघमारे, मा. राहुल शेवाळे तसेच मा. आमदार अमोल खताळ यांच्याशी सखोल राजकीय चर्चा केली. या चर्चेत निवडणूक रणनिती, प्रभागनिहाय समन्वय आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला.
यावेळी जनहित लोकशाही पक्षाने स्पष्ट भूमिका घेत मुंबई महानगरपालिकेतील 29 महानगर पालिके मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तळागाळात जाऊन प्रचार, संपर्क आणि संघटनात्मक काम करतील, असे आदेश मा. अशोकराव आल्हाट यांनी दिले. “महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावा,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पाठिंब्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास जनहित लोकशाही पक्षाच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे मुंबईतील निवडणूक समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant