कट्टर शिवसैनिक दगडू सकपाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक दगडू सकपाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
लालबाग-परळ भागात तगडा संपर्क,
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ (Dagdu Sapkal) यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र. 203 मधून इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आजचा दिवस शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्टावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कडवट कार्यकर्त्यांचा विचारही उबाठा गटात केला जात नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला. दगडू सकपाळ यांनी खऱ्या अर्थाने मुंबईच्या शिवसेनेचा पाया आहे. दगडू सकपाळ यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली. आता लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचा आर्शीवाद मिळाला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर