शिवतीर्थवरुन ठाकरे बंधूंचा एकत्रित वार, फडणवीस लक्ष्य, मराठी जणांना साद
शिवतीर्थवरुन ठाकरे बंधूंचा एकत्रित वार, फडणवीस लक्ष्य, मराठी जणांना साद
Uddhav Thackeray मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आज शिवतीर्थावर होत आहे. तब्बल 20 वर्षानंतर अवघ्या महाराष्ट्राला हे सुखद चित्र बघायला मिळालंय. या सभेस्थळी मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळालं. महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. या आवाहनाला मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत शिवतीर्थावर गर्दी केल्याचे दिसून आलं. दरम्यान यावेळी बोलताना दोन्ही ठाकरे बंधूनी भाजप, शिवसेनेसह महायुतीवर चौफेर फटकेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्यांना मी हजार रुपये देतो. मात्र मला त्यांचा चोरीचा पैसा नकोच. पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आवाहन देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या-चंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम नं करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो. अशी बोचारी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. अहो मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवताय, हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरुन मुंबईचं नाव ठेवलं आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना (Mumbai) आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरे मुंबईकरांना आवाहन केलं. तसेच, आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी 2014 ते 2024 या गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर