यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग
यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग
मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या यामिनी जाधव या 2026 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या राहत असून, त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. खंद्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाण्राया जाधव यांनी मागील कार्यकाळात केलेल्या कामाच्या जोरावर यंदा मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जाधव यांनी 2022 ते 2027 या काळात मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून तसेच 2019 ते 2014 या काळात महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून काम पाहिले आहे. या कालावधीत केलेल्या विविध विकासकामांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते यशवंत जाधव यांच्या कामाचा आणि अनुभवाचा त्यांना मोलाचा आधार मिळाला आहे.
“शब्दांपेक्षा कामाला अधिक ताकद असते आणि आश्वासनांपेक्षा लोकांची खरी सेवा अधिक परिणामकारक ठरते,'' असा ठाम विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा विश्वास त्यांनी केलेल्या कामातून जनतेसमोर सिद्ध केला आहे.
भायखळा विधानसभा प्रभागात विविध कामे करून देण्यात त्या यशस्वी ठरल्या असून, या प्रभागातील प्रत्येक जनमानसात त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या वेळी जनमत आपल्या बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यामिनी जाधव म्हणाल्या, “यापुढेही माझ्या शब्दांपेक्षा माझे कामच अधिक बोलेल.'' 2026 च्या निवडणुकीत त्यांच्या कामगिरीला मतदार किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यामिनीताई यांनी केलेल्या कामाचा धडाका खालीलप्रमाणे -
पायाभूत सुविधा आणि गतिमान शाहरनिमितीमध्ये माझगाव येथे साडे चार टन ब्रॉझपासून साकारलेला वीर शिरोमणी महाराणा यांच्या भव्य पुतळ्यासह चौकाचे शुभोभिकरण, जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाचे शुभोभिकरण, कोविड-19 काळात त्यांनी उचलली अन्नसुरक्षेची जबाबदारी, भायखळा जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 आायसीयू बेड, 100 व्हेंटिलेटर वाढविण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करून ती पूर्ण करून घेतली. या संकटकाळात नागरिकांना धान्य, जीवनाश्यक वस्तू, रोगप्रतिकारक औषधांचा पुरवठा करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या होत्या तसेच प्रशासनाबरोबर सातत्यपूर्ण समन्वय आणि तातडीची कार्यवाही करण्यात त्या यशस्वी झाल्या. पुढे महिलांचे सक्षमीकरणासाठी महिलांना 55 फूड ट्रकचे वितरण केले, स्वयंरोजगाराचे म्हणून 4000 शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप केले आहे. तसेच महिलांचे सुरक्षित बाळंतपण रुग्णालयात व्हावी व 1 रुपयाचे 10 सॅनिटरी नॅपकीन मिळविण्यासाठी विधानसभेत परखड मागणी केली व ती यशस्वी पूर्ण करून घेतली. यामिनीताईंची हिरकणी कक्ष योजना सरकारने सपूर्ण राज्यात राबविली. तसेच युवक सक्षमीकरणासाठी प्रभागात दीनदयाळ उपध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन त्यांनी केले. बेरोगार युवकांना झेरोक्स मशिनचे वाटप करून स्वयंरोजगार उभारले. विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब आणि संगणकाचे वाटप केले व सोबत विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केले. तसेच भायखळ्यात दोन फिरत्या वाचनालयांची सुरूवात केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी परिसरातज्येष्ठ नागरिक केंद्र व डे-केअर सेंटरची उभारली केली. समाजातील निराधार व अनाथांना मदत केली. ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप, हिवाळ्यात ब्लँकेटचे वाटप केली, अशी एक ना अनेक कामे करून विद्यार्थ्यांपासून महिलापर्यंत, युवा पासून वृध्दापर्यंत त्यांनी सर्वागीण विकास करून परिसरात त्यांनी त्यांच्या कामाची छाप सोडली आहे.
यामिनीताई यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनी त्यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाकडून त्यांना आदर्श आमदार पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. दैनिक सांज महानगरी, मुंबई यांच्यावतीने सेवाव्रती महिला पुरस्कार - 2024 हा पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant