खा. संजय राऊतांच्या हस्ते ठाणे शहराचे वचननामा प्रकाशन
खा. संजय राऊतांच्या हस्ते ठाणे शहराचे वचननामा प्रकाशन
मविआच्या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन
ठाणे : ठाण्याच्या रस्त्यावर ठेकेदारांनी हैदोस घातला असून तलावांचे शहर, सांस्कृतिक शहर असलेले ठाणे बकाल झाले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवत्ते खा. संजय राऊत यांनी ठाणेकरांना केले.
महाविकास आघाडीचा वचननामा आज खा. संजय राऊत, माजी खा. राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. मात्र या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता.
ठाणे हे पुण्याच्या तोडीचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जात होते. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य यांची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचे, तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख होती. पण, ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रम्सचा मोठा अड्डा बनत चालले आहे, असा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवत्ते संजय राऊत यांनी सोमवारी ठाण्यात केला आहे. ठाण्यात कोट्यवधींचे ड्रम्स सापडतात, तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस' कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होत आहे. ठाण्यातील शाळा, महाविद्यालये, पानटप्रया, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अमली पदार्थ कुठून येतात आणि पोलीस काय करत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत केवळ विरोधी उमेदवारांना उचलण्याचे काम पोलीस करत असतील, तर ही लोकशाहीची थट्टा आहे, असेही ते म्हणाले. मंत्र्यांच्या सत्ताध्रायांच्या नातेवाईकांपर्यंत अमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जात आहे. आणि सत्ताधारी यावर मौन बाळगत आहेत. लोकांनी याच मुद्यावर मतदान केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
अमली पदार्थाचा कारखाना सापडतो, आणि त्या कारखान्याचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकांपर्यंत जातात, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की, ठाण्यात ड्रग्स इतक्या मुबलक प्रमाणात, खुलेआम मिळत असतील, तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरीवर रस्त्यावर समोरच्या चौकात, संपूर्ण ठाणे शहरात ड्रम्स मिळत असतील, तर उपमुख्यमंत्री, आमदार बाकी सगळ्या विषयांवर बोलतात, पण एक पिढी नासवण्राया अमली पदार्थांवर एक शब्द का नाही. ही केवळ राजकीय बाब नाही. ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले.
बिल्डरांचे ठाणे आहे. हे आम्ही मान्य करतो. पण त्या बिल्डरांच्या आडून जर गुन्हेगारी, खंडणीखोरी, दरोडेखोरी सुरू असेल, तर ते ठाण्याचे चरित्र असूच शकत नाही. या ठाण्याला मंत्री आहे. या ठाण्याला मुख्यमंत्री होते आणि आज या ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत. मग ठाण्याची ही अवस्था कोणामुळे झाली. हा प्रश्न कोण विचारणार, असेही ते म्हणाले. आमच्यावर आरोप करणे सोपे आहे. पण एक वर्ष महापालिका बरखास्त असताना टेडरबाजी कोणी केली. महापालिकेची लूट कोणी केली. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका कोणी ओरबाडल्या. ठाणे महानगरपालिकेत कर्मच्रायाचे पगार द्यायला पैसे नाहीत. ही वेळ ठाण्यावर कोणी आणली. महापालिका सुटल्या गेल्या, आणि त्याच सुटीतून तुमचे बंगले उभे राहिले, अशी टिका त्यांनी केली. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे' अशी लावली जाते. हे ठाणे गुजरातचे नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा ठाणे आहे, याची लाज वाटली पाहिजे, अशी टिकाही त्यांनी केली. ठाण्याचा रेहमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टिका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.
-------------------
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर