सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे, मुंबई पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी सांगत त्यांना निरोप दिला. रश्मी शुक्ला यांनी आपल्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे सोपवला. सन 1990 च्या आयपीएस तुकडीचे भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी रश्मी शुक्ला यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील कामाचीही माहिती दिली. सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, पोलीस महासंचालक म्हणून दातेंचा दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांची पोलीस खात्यात ओळख आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) तसेच राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची (एसआयटी) देखील धुरा दातेंनी सांभाळली आहे. सीबीआय आणि सीआरपीएफ मध्ये देखील दातेंनी वेगवेगळ्या पदावर काम केलं आहे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दातेंनी दहशतवाद्यांशी दोन हात केले होते. दहशतवादी अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दाते जखमी देखील झाले होते. दहशतवाद्यांच्या त्या ग्रेनेडचे शार्पनेल अद्यापही त्यांच्या डोळ्यात आहेत. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी मुंबई गुन्हे शाखेची तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर