राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार, राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश
मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. मात्र उमेदवारांना पुन्हा नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद नाही. 2 जानेवारी (नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख) नंतर संबंधित परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जातील.
निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली अजून आतापर्यत भाजपाचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल 22 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 उमेदवार तर शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवार आणि अपक्ष एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादीही समोर आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade