शिव आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने उधळले
पालिकेच्या 374 कर्मचाऱ्यांना निवडणूक कामात सक्तीने जुंपण्याचे निवडणूक आयोगाचे मनसुबे शिव आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने उधळले
मुंबई - शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर व राज्य सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार नुकत्याच दैनिक सामना मध्ये प्रकाशित झालेल्या बातमी च्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सक्तीच्या आदेशानुसार जे. जे. रुग्णालयातील आरोग्याशी निगडित असलेल्या डॉक्टर,नर्सेस,विविध तंत्रज्ञ वगैरे अशा जवळ जवळ 374 कर्मच्रायांना निवडणूक कामात सक्तीने जुंपण्यात येणार होते यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही यास्तव आज शिव आरोग्य सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त श्री.शंकरवार सर यांची भेट घेऊन या गंभीर मुद्यावर चर्चा करण्यात आली व तसे निवेदन हि देण्यात आले की जे जे समूह रुग्णालय म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्याचा कणा,भारतातून लाखो लोक या रुग्णालयात उपचारासाठी येतात हा कणा निकामी करण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत केले जात होते. मात्र शिव आरोग्य सेनेने त्यांचे हे दुष्कृत्य उधळून लावताना रुग्णालयातील सर्वांना निवडणुकींच्या कामाला जुंपून सद्या जे.जे. रुग्णालयात 1700 रुग्ण दाखल असलेल्या त्यातील 300 रुग्ण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत यांची शस्त्रक्रिया,एक्सरे, सिटी स्कॅन "निवडणूक आयुक्त" करणार आहेत का ? असा सवाल त्यांना विचारण्यात आला.शिवसेना स्टाईलने दणका देताच एकूण 378 पैकी 202 डॉक्टरांसह इतर वैद्यकीय तज्ञ कर्मच्रायांना वगळण्यात आले तसेच इतर कोणत्याही रुग्णालयातील डॉक्टर्स व रुग्णसेवेशी निगडीत इतर कर्मच्रायांचे मानवतेच्या दृष्टिकोनातून निवडणूक कामाचे आदेश असतील तर तेही रद्द करावेत ही विनंती करण्यात आली त्याप्रसंगी आरोग्य सेनेचे मलबार हिल समन्वयक व आम्ही गिरगावकर चे सचिव श्री.मिलिंद वेदपाठक,डॉक्टर सेल मुंबई सचिव डॉ.अलिफिया रिझवी,भायखळा विधानसभा समन्वयक श्री.रवींद्र बाचनकर, विधान.संघटक श्री.राजाराम झगडे, विधान.संघटीका सौ.अक्षया चव्हाण,प्रभाग क्र.211 चे आरोग्य संघटक श्री.संजय घोडके,प्रभाग क्र.207 च्या आरोग्य संघटीका नेहा कदम,प्रभाग क्र.212 च्या आरोग्य संघटीका गुलाब ठाकूर व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर