कोणत्याही आमिषाला बळी पडू नका- राज ठाकरेंचा कानमंत्र
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका- राज ठाकरेंचा कानमंत्र
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व 53 उमेदवारांना थेट कानमंत्र देत निवडणूक रणधुमाळीला धार दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युतीत मनसेच्या वाट्याला 53 जागा आलेल्या आहेत. आज 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उमेदवारांना तीन महत्त्वाचे सल्ले देत, “मुंबई मराठी माणसाची आहे. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
राज ठाकरे यांनी उमेदवारांशी बोलताना म्हटले की, “तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशांची आमिष दाखवली जातील. मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.” स्वतःचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटले, “मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी उमेदवारांना बजावले.
बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा - मुंबई मराठी माणसाची आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथला आपली 10 लोकं उभी करा. बोगस मतदान झाले नाही पाहिजे, यासाठी तुम्ही सतर्क राहा. जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा, असा देखील राज ठाकरे यांनी उमेदवारांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या या थेट आणि आक्रमक मार्गदर्शनामुळे मनसेच्या उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले असून, महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी-
वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर
वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर
वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव
वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक
वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर
वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य
वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर
वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ
वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम
वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के
वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे
वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर
वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार
वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले
वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली
वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख
वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख
वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण
वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर
वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे
वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant