उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंनाही ठाण्यात धक्का: दोन उमेदवारांचे अर्ज बाद,
उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंनाही ठाण्यात धक्का: दोन उमेदवारांचे अर्ज बाद,
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान ठाकरे गट आणि मनसेच्या (MNS) एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदे गटाचे मनोज शिंदे यांच्याविरोधात रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. या उमेदवाराने याबाबत संशय व्यक्त करताना निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. माझा उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद ठरवण्यात आला. मी सही केली नाही आणि बँकेचे स्टेटमेंट न दिल्याचे कारण सांगत माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. माझा फॉर्म अवैध ठरवल्यानंतर मला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही की, तू पुन्हा एकदा नवीन प्रतिज्ञापत्र घेऊन ये. मी सकाळी आरओकडे आलो त्यावेळी त्याने मला काही सांगितले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला 10 मिनिटं असताना मला नवीन प्रतिज्ञापत्र घेऊन यायला सांगितले. मी गरीब घराचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्याबरोबर अन्याय करण्यात आला. माझ्यासमोर शिंदे गटाचे मनोज शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी तरी कुठे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं तर नाही ना, असा संशय ठाकरे गटाच्या उमेदवाराने बोलून दाखवला.
तर दुसरीकडे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील मनसेचे उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना मला कागदपत्रं राहिल्याचे सांगण्यात आले. ती कागदपत्रं वेळेत देऊनही पोलिसांनी आम्हाला आत सोडण्यास नकार दिला. काहीवेळाने पोलिसांनी आम्हाला आतमध्ये सोडले तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचं काहीही ऐकून न घेता उमेदवारी अर्जाची छाननी केली आणि कागदपत्र नसल्याचे कारण देत आमचा अर्ज अवैध ठरवला. जेव्हा आम्ही यावर हरकत घेतली तेव्हा आम्हाला तुम्ही वेळेत न आल्याचं कारण सांगण्यात आले, असे मनसेच्या प्राची घाडगे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant