निष्ठेला नाकार… पण सेवेला नाही!
जान्हावी जगदीश राणे – अपक्ष लढत, जनतेसाठीच!
महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
जान्हावी जगदीश राणे , गेल्या अनेक वर्षांपासून भाजप पक्षाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, निस्वार्थपणे जनतेची सेवा करत होत्या. महिला सक्षमीकरण, बचतगट, आरोग्य शिबिरे, गरजू महिलांसाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी केवळ राजकारण नाही, तर माणुसकी जपली.
पण दुर्दैवाची बाब म्हणजे,
इतक्या वर्षांच्या प्रामाणिक सेवेचा मोबदला म्हणून पक्षाने त्यांना तिकीट नाकारले.
निष्ठा बाजूला पडली… कार्याला किंमत उरली नाही.
मात्र जान्हावी राणे खचल्या नाहीत.
कारण त्यांचा विश्वास पक्षावर नव्हे, तर जनतेवर आहे.
“तिकीट नाकारले गेले, पण माझ्या मनातील सेवा थांबवू शकत नाही.”
या भावनेतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
आज अनेक महिला, युवक, सामान्य नागरिक म्हणत आहेत –
“आमच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी व्यक्ती आम्हाला हवी, फक्त पक्षाचा शिक्का नव्हे!”
ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची राहिली नाही,
ती झाली आहे निष्ठा विरुद्ध अन्याय,
सेवा विरुद्ध राजकारण
आणि जनता विरुद्ध निर्णयप्रक्रिया यांची!
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant