स्वाभिमानी पक्षाच्या मुंबई शहर अध्यक्षपदी श्री. मोहन किसन वायदंडे यांची नियुक्ती
स्वाभिमानी पक्षाच्या मुंबई शहर अध्यक्षपदी श्री. मोहन किसन वायदंडे यांची नियुक्ती
मुंबई, प्रतिनिधी :
स्वाभिमानी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी मुंबई शहर अध्यक्षपदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनुभवी नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार श्री. मोहन किसन वायदंडे यांची स्वाभिमानी पक्षाच्या मुंबई शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
श्री. मोहन किसन वायदंडे हे मुंबईसारख्या महानगरात सामाजिक, मानवाधिकार व स्वयंसेवी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. ते सध्या वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए.एफ. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, तसेच लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए1 चे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या व्यापक सामाजिक अनुभवाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे स्वाभिमानी पक्षाच्या मुंबई शहरातील संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः मुंबईतील सामान्य जनता, कामगार, कष्टकरी, शेतकरी तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पक्ष अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
श्री. वायदंडे यांच्या सामाजिक कार्याची, मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाची आणि संघटन कौशल्याची दखल घेत स्वाभिमानी पक्षाने ही निवड केल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरात पक्षाची ताकद वाढेल आणि जनतेच्या हक्कांसाठी स्वाभिमानी पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नव्या जबाबदारीसाठी श्री. मोहन किसन वायदंडे यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेक सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संघटनांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant