वार्ड क्रमांक २०६ मधील जनतेचा विश्वास – नाना आंबोले!
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवसेनेतून, वार्ड क्रमांक २०६ मधील जनतेने आपल्या प्रेमातून, विश्वासातून आणि पसंतीतून नाना आंबोले यांना नगरसेवक म्हणून पसंती दिली जात आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
“सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणं हेच खऱ्या शिवसैनिकाचं कर्तव्य” – बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार मनाशी बाळगून नाना आंबोले यांनी कायम जनतेसाठी काम केले आहे. नाना आंबोले हे नाव म्हणजे फक्त एक उमेदवार नाही, तर प्रत्येक घरातील अडचणी आपल्याच आहेत असे मानून त्यावर तोडगा काढणारा आपला माणूस आहे.
रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे आवाज उठवला. कोणताही भेदभाव न करता, राजकारणापेक्षा माणुसकी, न्याय आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणजे नाना आंबोले.
बाळासाहेबांच्या विचारांवर चालत, संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाणे, तरुणांना दिशा देणे आणि ज्येष्ठांचा सन्मान राखणे हेच नाना आंबोले यांचे शिवसैनिक म्हणून खरे विचार आहेत.
आज वार्ड क्रमांक २०६ मधील जनतेचा वाढता पाठिंबा हेच सिद्ध करतो की,
“काम बोलतंय – म्हणूनच लोकांचा विश्वास वाढतोय!”
धनुष्यबाण हीच ओळख, शिवसेनाच आमची ताकद
बाळासाहेबांचे स्वप्न – आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने वार्ड २०६!
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade