Breaking News
ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंब
हुरुन इंडियाच्या अहवाल – २०२५ हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनसने त्या कुटुंबाची यादी जाहीर केली आहे. यावर्षी पुन्हा अंबानी कुटुंबाने या यादीत पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब लागोपाठ दुसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान राखून आहे.त्यांची एकूण संपत्ती आता २८.२ लाख कोटी रुपये झाली आहे.हा भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जवळपास १२ वा हिस्सा आहे. या कुटुंबाच्या ऊर्जा, डिजिटल आणि किरकोळ विक्री क्षेत्रात मोठी भूमिका निभावत आहे. १९५७ मध्ये सुरु झालेल्या अंबानी कुटुंबाचा व्यवसाय आता दुसरी पिढी सांभाळत आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला ग्रुप ६.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. सिमेंट आणि मेटल इंडस्ट्रीमध्ये यांचे मोठे नाव आहे. १८५० च्या दशकात बिर्ला कुटुंबाचा व्यवसाय सुरु झाला होता. आता त्यांची चौथी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळत आहे.
अंबानी: २८.२ लाख कोटी रुपये
बिर्ला: ६.५ लाख कोटी रुपये
जिंदल: ५.७ लाख कोटी रुपये
बजाज: ५.६ लाख कोटी रुपये
महिंद्रा: ५.४ लाख कोटी रुपये
नाडर: ४.७ लाख कोटी रुपये
मुरुगप्पा : २.९ लाख कोटी रुपये
प्रेमजी : २.८ लाख कोटी रुपये
अनिल अग्रवाल : २.६ लाख कोटी रुपये
दानी, चोकसी, वकील (एशियन पेंट्स ) : २.२ लाख कोटी रुपये
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर