झोपडपट्टीतील शाळा, महाविद्यालयासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन
झोपडपट्टीतील शाळा, महाविद्यालयासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन
मुंबई - महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई ही संस्था धारावी झोपडपट्टीत मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय चालविते. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था धारावी झोपडपट्टीतील गोरगरिब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. या संस्थेस दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व कंपन्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी असे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.*
आत्तापर्यंत या संस्थेच्या शाळा, महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन असंख्य जण हे उच्चविद्याविभूषित झाले असून डाॅक्टर, इंजिनियर्स, वकिल, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी झालेले आहेत. आपण देणार असलेली देणगी ही झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रम, गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी असणार आहे. अशा या संस्थेस सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. आपण देणारी देणगी ही आयकर करमुक्त आहे. आपली देणगी संस्थेच्या बॅंक खात्यावर जमा करावी. बॅंक खाते तपशिल :*.
*Union Bank Of India, Branch- Dharavi, A/C number-* 564002010009092,
IFSE : UBIN0556408
Address: Dharavi, Mumbai-800017 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7738626262 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade