Breaking News
’मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करा’
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांची सरकारकडे मागणी..
मुंबई - राज्यातील राज्य शिक्षण मंडळांव्यतिरिक्त शाळांमध्ये मराठी शिकवण्यासंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी न करण्राया शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमित ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना या संदर्भातील पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. मनविसेचे सरचिटणीस संतोष गांगुर्डे, प्रमुख संघटक चेतन पेडणेकर व यश सरदेसाई यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन भोयर यांना दिले. 'महाराष्ट्र ही अस्मितेची भूमी आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, ती या राज्याच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा मूलभूत पाया आहे. शासनाने राज्यभरातील सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट शासन अधिनियम (2020) प्रसूत केला आहे. परंतु अनेक खासगी तसेच काही नामांकित बोडांच्या शाळा हा निर्णय सर्रास पायदळी तुडवत आहेत,' असे या निवेदनात म्हटले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant