Breaking News
खा. संजय दिना पाटील यांनी केले उद्धव ठाकरे यांचे स्वागत
मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असून त्याचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे मुंबई पासून दिल्ली पर्यंत राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे दिल्ली दौ-यावर गेले आहेत. आज इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिल्ली येथे उध्दव व आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
चालू अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर, पेहलगाम हल्ला या सह विविध विषयांना घेऊन विरोधकांनी सरकारला जेरीस आणले आहे. त्यामुळे सरकार अडचणीत असताना उद्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. राहुल गांधी या बैठकीचे निमंत्रक असून त्यांच्या निमंत्रणावरुन उध्दव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद होईल तर ८ ऑगस्ट रोजी ते संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला भेट देणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant