Breaking News
भाजपचे काळाचौकीमध्ये महा आरोग्य शिबीर
भाजपा शिवडी विधानसभा यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन अभ्युदयनगरच्या समाजमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. यात मोफत कर्करोग तपासणी डोळे कान नाक, मोतीबिंदू अनेक रक्त चाचण्या घेण्यात आल्या परिसरातील नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिरासाठी एन के ढाभर कॅन्सर फाउंडेशन आणि आदित्य ज्योती आय हॉस्पीटल चे सहकार्य लाभले होते . भाजपा नेते प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. या महाआरोग्य शिबिराचे आयोजक स्वप्नील सावर्डेकर,जान्हवी राणे,महेश पावसकर आणि सहकारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर