Breaking News
काळाचौकीचा महागणपती या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडळाचे पारंपरिक आगमन ३ ऑगस्ट रोजी कलागंध परळ वर्क शॉप येथून सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. यंदाची महागणपतीची मूर्ती शिवशंकराच्या रूपामध्ये असणार आहे . आगमन मिरवणुकीमध्ये पारंपरिकतेचे भान ठेऊन कोकणातील सुप्रसिद्ध अशा पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे तसेच महिलांचे आणि पुरुषांचे मर्दानी खेळ होणार आहेत..तसेच महागणपती चौक येथे भव्य प्रमाणात महाकाल आरतीचे आयोजन केले आहे , व माझगाव पथक महागणपती समोर भारतमाता येथे ८ थरांची सलामी देणार आहे आणि इतरही बऱ्याच मनोरंजनात्मक गोष्टीचे दर्शन होणार आहे.
आणि अर्थातच ८ फुटी चाळीतून एवढा महागणपती आत कसा जातो याचे दर्शन ही भाविकांना घडणार आहे.
अध्यक्ष ..श्रीनाथ पराडकर
सेक्रेटरी .. योगेश गावडे
कोशाध्यक्ष ...सिद्धेश सावंत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant