Breaking News
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस अॅप आणि जिओ-फेन्सिंग अनिवार्य, अन्यथा पगार मिळणार नाही, फेसॲप नोंदणी
मुंबई : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, तलाठ्यांपासून (Talathi) ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे. यासंदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी दिली. विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ॲपवर (App) नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे, महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडींग नोंदणी करावी लागेल, अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थिती नसल्याची नोंद होईल.
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार (सप्टेंबरमध्ये मिळणारा) केवळ फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल. याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. महसूल मंत्र्यांकडून रायगड जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी हे आदेश दिले आहेत.
फेस ॲपवर नोंदणी न केल्यास गैरहजेरी
तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच फेस ॲपवर नोंदणी बंधनकारक असून ज्या गावात नोकरी आहे, तिथे जात उपस्थिती लावावी लागेल. तसेच, महसूल कर्मचाऱ्यांची आता त्यांच्या कार्यालयात उपस्थिती आवश्यक असणार आहे. तर, नोंदणी न केल्यास त्या दिवशी उपस्थिती नाही, असे समजण्यात येईल. त्यामुळे, तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंत सर्वच महसूल कर्मचाऱ्यांना कार्यालया दररोज यावे लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे