Breaking News
देशातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर AI ची नजर
मुंबई - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहऱ्याव्दारे ओळख प्रणाली (Facial Recognition System) कार्यान्वित होणार आहे. ही प्रणाली संशयित गुन्हेगारांना ओळखण्यात मदत करेल आणि रेल्वे परिसर अधिक सुरक्षित बनवेल. या यंत्रणेचा उपयोग महिलांच्या आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये देशातील सात महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांची निवड यासाठी केली आहे. जेथे AI-आधारित सुरक्षा प्रणाली स्थापन केली जाणार आहे.
ही सर्व रेल्वे स्थानक प्रवाशांची होणारी गर्दी आणि महत्व यादृष्टीने निवडली आहे. येथे सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या डिजिटल इंडिया आणि स्मार्ट गव्हर्नंस च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि भयमूक्त प्रवास करण्याचा आनंद मिळाणार आहे. भारतीय रेल्वे सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुगम प्रवास निश्चित करण्यासाठी प्रयत्नरथ आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट लायटिंग, आपत्कालीन कॉल बॉक्सेस, आणि ड्रोन सर्व्हिलन्स यांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वे परिसर अधिक बुद्धिमान आणि सुरक्षित बनवण्यात येणार आहे. प्रशासनाने गोपनीयतेचे नियम काटेकोरपणे पाळण्यात येतील असे आश्वासन दिले असून, या प्रणालीसंदर्भात सार्वजनिक चर्चाही सुरू आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर