Breaking News
Airtel च्या ग्राहकांना Perplexity Pro’ चे १७ हजारांचे सबस्क्रीप्शन मोफत
मुंबई -: देशातील आघाडीचे नेटवर्क भारती एअरटेलने आपल्या पात्र ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. आता एअरटेल ग्राहक तब्बल17 हजार रुपये किमतीचे ‘Perplexity Pro’ सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळवू शकतात. सध्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारखे एआय चॅटबॉट्स लोकप्रिय झाले आहेत. पर्प्लेक्सिटी हे एक एआय-चालित सर्च इंजिन आहे. हे तुम्हाला इंटरनेटवरून माहिती गोळा करून कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देते.
Perplexity हे जीपीटी-4.1 आणि क्लॉड 4.0 सोनट यांसारख्या अत्याधुनिक भाषा मॉडेल्सचा वापर करून अचूक आणि स्पष्ट उत्तरे देते, असे कंपनीने म्हटले आहे. Perplexity Pro सह यूजर्स गूगल, ओपनएआय आणि अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांच्या लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये सहज स्विच करू शकतात आणि त्यांना जे सर्वोत्तम वाटते ते वापरू शकतात.
‘पर्प्लेक्सिटी प्रो’ सबस्क्रिप्शनमध्ये मिळतील हे फायदे
मोफत Perplexity Pro सबस्क्रिप्शन कसे मिळवाल?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant