Breaking News
लायन्स इंटरनॅशनल जिल्हा 3231-A1 लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन या संघटनेच्या वतीने लायनइजम वर्ष २०२५–२०२६ मधील पहिली मासिक सर्वसाधारण सभा १६/७/२०२५ रोजी किंग्स्टन टॉवर,२० वा मजला, फ्लॅट क्रमांक २००५/०६, जी.डी. आंबेकर मार्ग,काळाचौकी येथे मुंबईचे माजी नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023-24, लायन्स क्लब ऑफ मिटवूनचे प्रेसिडेंट लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. सदर सभेत पदाधिकारी व सदस्य यांना लायन्स क्लब ची नीतिमूल्ये,मिडटाऊन ची सदस्य संख्या वाढवणे,संघटनेच्या पदां विषयी माहिती देऊन पुढील वर्षासाठी संघटनेच्या वतीने होणारे कार्यक्रम व त्यातील सहभाग तसेच इंटरनॅशनल कडून आलेले वार्षिक कार्यक्रम हंगर(अन्न दान),पर्यावरण आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर सर्वांनी सर्जनशील कल्पना मांडल्या. Mission 1.5 या इंटरनॅशनल प्रेसिडेंटच्या नेतृत्वाखालील दूरदृष्टीपूर्ण उपक्रमा विषयी माहिती व उपस्थिती बाबत सूचना देण्यात आल्या व क्लब प्रेसिडेंट साहेबांनी ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षात संघटनेचे उत्कृष्ट काम केले त्या सर्वांचे कौतुक केले त्याप्रसंगी लायन अनुराधा हेगडे, लायन नरेंद्र वाबळे,क्लब सचिव जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ, खजिनदार लायन विलास डांगे,फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन सौ.ज्योती भोसले,लायन विजय रायमाने, लायन सुभाष भोसले,लायन उदय अशोक पवार,लायन स्वप्निल पंडित,लायन सचिन राऊत,लायन दिगंबर पाटील, लायन स्वप्नील पाटील,लायन राजेश कांबळे,लायन महेश आंब्रे,लायन साईगोपाल चिल्का,लायन दिलीप वरेकर,लायन नंदकुमार बागवे,लायन अशोक पवार,लायन प्रज्ञा बाईत इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant