सेवाभावी संकल्प 2025 उपक्रमांतर्गत शालेय साहित्याचे मोफत वाटप
सेवाभावी संकल्प 2025 उपक्रमांतर्गत शालेय साहित्याचे मोफत वाटप
कणकवली (प्रतिनिधी): नवसंकल्प सेवाभावी संस्था (रजि.) मुंबई/महाराष्ट्र ही संस्था गेली 15 वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील खेडोपाड्यात जाऊन गरीब, गरजू, अंध-अपंग तसेच वसतीगृह, आश्रमशाळा व आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:स्वार्थपणे सेवा देत आहे. या संस्थेच्या वतीने शालेय साहित्य, गणवेश, क्रीडा साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.या उपक्रमाची माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा. राजेश कांबळे (आर.के.) व सचिव मा. संदीप राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
संस्थेच्या 16व्या वर्षानिमित्त यावर्षीचा सामाजिक उपक्रम ‘सेवाभावी संकल्प 2025' दिनांक 18 जून 2025 रोजी कोकणातील कणकवली तालुक्यातील दिगवळे गावात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत दारस्ते, दिगवळे, कनेडी आणि सांगवे या गावांतील 2री ते 12वीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वाटपामध्ये विद्यार्थ्यांना दफ्तर, वह्या, पेनपॅकीट, पेन्सिल बॉक्स, पट्टी, कंपास बॉक्स, पाऊच, उजळी व चित्रकला वह्या यांचा समावेश होता. साहित्याचे वितरण कनेडी बाजारपेठ परिसरातील संस्थेचे हितचिंतक यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित पालकांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत नवसंकल्प सेवाभावी संस्थेचे मन:पूर्वक आभार मानले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant