Breaking News
भारत बंदची घोषणा... 25 कोटी कामगारांचा आज देशव्यापी संप
कामगार, शेतकरी विरोधी तसेच उद्योगपती समर्थक धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचे आवाहन
- बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे 25 कोटी कामगार आणि कर्मचारी बुधवारी (9 जुलै ) देशभरात संपावर जाणार आहेत. या संपामुळे अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी या संपाची घोषणा केली आहे. सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी तसेच उद्योजकहिताच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली असल्याचे या संघटनांनी स्पष्ट केले आहे.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, देशभरातून सुमारे 25 कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असून, शेतकरी आणि ग्रामीण कामगारही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतील.
कोणत्या संघटना या देशव्यापी संपात सहभागी होणार?
संपामागची प्रमुख कारणं
कामगार संघटनांचं म्हणणं आहे की सरकारने आणलेले 4 नवीन श्रम कोड हे कामगारांचे हक्क कमी करणारे आहेत. यामध्ये युनियनच्या हालचालींवर निर्बंध, कामाचे तास वाढवणे आणि नोकऱ्यांची असुरक्षा यांचा समावेश आहे.
सरकारी मालमत्तेच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात तसेच कंत्राटी पद्धतीने भरती वाढवल्याच्या धोरणांना विरोध केला जात आहे.
संयुक्त किसान मोर्चाही या संपात सहभागी असून, किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) कायदेशीर हमीची मागणी तसेच जुन्या कृषी कायद्यांविरोधात सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
कामगार संघटनांचा आरोप आहे की सरकारने ना तर किमान वेतन वाढवले, ना जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली, तसेच रोजगार निर्मितीच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले आहे.
कामगार संघटनांच्या प्रमुख मागण्या
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर