Breaking News
मायक्रोसॉफ्टच्या तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. या नोकरकपातीमुळे मायक्रोसॉफ्टच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के म्हणजे साधारण ९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यापूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालातच मायक्रोसॉफ्टमध्ये जुलैमध्ये आणखी एक कर्मचारी कपात होऊ शकते असे म्हटले होते. अहवालात असे म्हटले होते की, या पावलामुळे कंपनीच्या Xbox डिव्हिजन आणि ग्लोबल सेल्स टीममधील हजारो नोकऱ्या जाऊ शकतात. Xbox डिव्हिजनमधील गेल्या 18 महिन्यांतील ही चौथी मोठी कर्मचारी कपात असेल. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी या वर्षी मेमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती, जी गेल्या काही वर्षांतील मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी कर्मचारी कपात होती.
Microsoft च्या प्रवक्त्यांच्या मते, हे पाऊल प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या आणि व्यवस्थापनाचे स्तर कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. कर्मचारी कपातीचा परिणाम विविध टीम्स, भौगोलिक क्षेत्रे आणि कार्यकाळ यांवर होईल. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेतील (Artificial Intelligence) वाढत्या गुंतवणुकीदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुव्यवस्थित करत आहे. मायक्रोसॉफ्टचे परिचालन 1 जुलै ते 30 जून या आर्थिक वर्षानुसार चालते. जून 2024 च्या आकडेवारीनुसार कंपनीमध्ये 2.28 लाख पूर्णवेळ कर्मचारी होते. यापैकी 55 टक्के कर्मचारी अमेरिकेत काम करत होते.
AI वरील वाढत्या जोरानुसार मायक्रोसॉफ्टही यात गुंतवणूक वाढवत आहे. विविध उद्योगांमधील अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये एआयचे इंटिग्रेशन वेगवान करत आहेत. कंपन्या आता एआय-संबंधित नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत आणि पैसे वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant