Breaking News
लेखसंग्रह प्रकाशन सोहळा जल्लोषात
मुंबई - संजीवन कला विकास प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ साहित्यीका पूर्णिमा शिंदे लिखित स्पंदन लेखसंग्रह प्रकाशन सोहळा व पुरस्कार सोहळा नुकताच सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झाला. स्पंदन मधील संवेदनशील स्त्रीमन वैचारिक मूल्य व सामाजिक घडामोडी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उलगडून सांगितल्या आणि सर्वांना वाचन संस्कृती टिकविण्याचा संदेश दिला . आमदार पंकज भुजबळ यांनी पुणिॅमा ताईच्या वक्तृत्व कला आणि लेखन शैली विषयी भाष्य केले.आमदार सना मलिक यांनी स्पंदन पुस्तकातील व्यसनमुक्ती बद्दल भरभरून बोलले. डॉ सुकृत खांडेकर यांनी प्रहारच्या स्तंभलेखिका म्हणून गेले तीन वर्ष सातत्याने लिहिणाऱ्या लेखांचा कौतुकास्पद गोशवारा दिला. रविराज ईळवे, कल्याण आयुक्त यांनी कामगार कल्याण केंद्र व्याख्यानमालेत गौरव मूर्ती पूर्णिमा शिंदे या अनेक वर्ष जोडले असून उल्लेखनीय कार्याबद्दल सांगितले. शिवनेर दैनिक संपादक नरेंद्र वाबळे यांनी संजीवन कलाविकास प्रतिष्ठान आणि संस्थेच्या विकास व कार्याबद्दल प्रशासनीय माहिती दिली. संस्थेच्या अध्यक्ष सुनिता शिंदे यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य उद्दिष्टे आणि पर्यावरणाचा संदेश दिला.
उपरोक्त कार्यक्रमामध्ये सामाजिक,वैद्यकीय, कला व सांस्कृतिक,पोलीस, शैक्षणिक, उद्योजक या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनिताताई शिंदे यांनी प्रस्तावनेमध्ये संस्थेचा कार्यअहवाल उपस्थितांसमोर सादर केला. स्पंदन या आपल्या आठव्या पुस्तकाबद्दल पुर्णिमा शिंदे यांनी आपल्या साहित्य सेवा शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक कार्याचा आलेख भाषणातून स्पष्ट केला तर संस्थेचे खजिनदार एन.डी. खान सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
निवेदिका सुवर्णा गोपाळे व सुशांत शिंदे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती निलख,आदित्य गायकर अनुपिता खांडगे आणि अस्मिता चव्हाण यांनी सहकार्य केले केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade