Breaking News
डिजिटल फसवणुकीच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय गँगच्या तिघांना अटक
ठाणे - व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अटकेची धमकी देऊन तब्बल तीन कोटी रुपये उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने अशा प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किशोर जैन (63), महेश कोठारी (36) आणि धवल भालेराव (26) अशी आहेत. यामध्ये किशोर जैन हा एका पतसंस्थेचा अध्यक्ष आहे, महेश कोठारी कपड्यांचा व्यवसाय करतो, तर धवल भालेराव सौंदर्यवर्धक उत्पादनांच्या विक्री व्यवसायात आहे. हे तिघे आरोपी या आंतरराष्ट्रीय टोळीच्या संपर्कात कसे आले, याचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचा बनाव करून गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या फसवणुकीचा तपास सुरू केला असता, किशोर जैन, महेश कोठारी आणि धवल भालेराव ही नावे पुढे आली. या तिघांनी आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून काही रकमा परदेशात पाठवल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. सध्या सायबर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. याआधीही त्यांनी अशाच प्रकारे इतर नागरिकांची फसवणूक केली आहे का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade