Breaking News
लायन्स क्लब मेडिकल हबला बंसल कुटुंबाकडून डायलिसिस मशीन भेट
पुणे - औंध-खडकी येथील प्रख्यात उद्योजक व समाजसेवक रामनिवास चेतराम बंसल यांनी त्यांच्या पत्नी स्व. शकुंतला रामनिवास बंसल यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ मित्रमंडळ चौकात स्थित लायन्स क्लब आय फाउंडेशनच्या लायन्स मेडिकल हब ला अत्याधुनिक डायलिसिस मशीन अर्पण केली आहे. ही भेट श्रीमती महादेवी चेतराम बंसल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
१७००० चौरस फुट क्षेत्रफळामध्ये कार्यरत असलेल्या लायन्स मेडिकल हबमध्ये डोळ्यांच्या उपचारासाठी सुविधा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरद्वारे मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यल्प दरात केल्या जातात. याशिवाय सर्व सुविधा असलेली पॅथोलॉजी लॅबही येथे कार्यरत आहे.
अलीकडेच येथे किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी डायलिसिस विभाग सुरु करण्यात आला असून नाममात्र दरात उपचार केले जातात. सध्या येथे ८ मशीन कार्यरत असून बंसल कुटुंबाच्या या योगदानामुळे आणखी एक मशीन उपलब्ध झाली आहे. लवकरच आणखी एक मशीन कार्यरत होणार आहे.
एक सादगीपूर्ण कार्यक्रमात बंसल कुटुंबाने डायलिसिस मशीनचे पूजन करून ते रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित केले. या प्रसंगी रामनिवास बंसल, सचिन बंसल, सारिका बंसल, सिद्धी व दिया बंसल यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमास लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय सारडा, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट लायन राजेश अग्रवाल, पी.आय.डी नरेंद्र भंडारी, गीता जयप्रकाश गोयल, अतुल गोयल, अमित गोयल, सागर अग्रवाल (ब्रदरहुड फाउंडेशन), राजेंद्र मुच्छाल, विजय डांगरा यांच्यासह लायन्स क्लब, अग्रवाल समाज, व अनेक मान्यवर, समाजसेवक,उपस्थित होते.
लायन्स क्लबतर्फे बंसल कुटुंबाचे आभार मानण्यात आले व या मशीनद्वारे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर