Breaking News
हा देश नागरिकांना देणार ChatGPT चे मोफत सब्सक्रिप्शन
Open AI टूल ChatGPT चे सब्सक्रिप्शन मोफत वाटण्याची योजना UAE लवकरच तेथील नागरिकांना देणार आहे. हा जगातला पहिला असा देश आहे जो संपूर्ण लोकसंख्येला चॅटजीपीटी प्रीमियम व्हर्जन फ्री देणार आहे. या कामासाठी Open AI आणि युएई सरकार दरम्यान पार्टनरशिप देखील झालेली आहे. ज्यात अबू धाबी येथे युएई नावाचा एक मोठा डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
UAE मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ChatGPT प्लसचे फ्री एक्सेस मिळणार आहे. दुबईत राहणाऱ्या लोकांना एडव्हान्स एआय टुल्सचा वापर करता येणार आहे. या टुल्सचा वापर करणाऱ्या एक रुपयाही खर्च करण्याची गरज आता राहणार नाही. या प्रोजेक्टचा हेतू केवळ मोठा डेटा सेंटर तयार करण्याचा नसून याचा हेतू एआयद्वारे लोकांना जवळ आणण्याचा आहे. ChatGPT Plus Subscription चा मासिक प्लानची किंमत 20 डॉलर (सुमारे 1701 रुपये ) इतका आहे.
Open AI चे CEO सॅम ऑल्टमैन यांनी या प्रकल्पाला एक बोल्ड व्हीजन म्हटले आहे. AI च्या वापरातून चांगल्या आरोग्य सेवा, आधुनिक शिक्षण आणि क्लीन एनर्जीला जगभरातील अनेक स्थानांवर आणण्याची योजना आहे. या डीलमध्ये ओरेकल, सिस्को, एनव्हीडिया, जी 42 आणि सॉफ्ट बँक सारख्या मोठ्या कंपन्या सामील आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade