Breaking News
हेमंत ढोमेने केली नवीन चित्रपटाची घोषणा
मुंबई- : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठी शाळांची घटती संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व, यावर प्रकाश टाकणार आहे.
हेमंत ढोमे याने याआधी ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत, आणि आता तो मराठी शिक्षणाच्या जडणघडणीवर आधारित हा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटाची निर्मिती क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी आणि आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॉडक्शन सोबत करण्यात येणार आहे. हा चित्रपट मनोरंजनासोबत विचार करायला लावणारा** ठरणार आहे.
याबाबत हेमंत ढोमे म्हणाला,
“मराठी माध्यमातून मिळालेलं शिक्षण हे माझं बळ ठरलं, अडथळा नाही. मातृभाषेत शिकल्यामुळे मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी शाळांमुळेच आहे.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर