मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -
मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार -
पालकमंत्री गणेश नाईक
पालघर : मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा उपयोग करावा . जिल्हा प्रशासनामार्फत शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गणेश कुंड येथे वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी पालकमंत्री श्री .नाईक बोलत होते.
यावेळी खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे , तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते
शाडू माती उपलब्ध होण्यासाठी सी एस आर फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले त्याप्रमाणे सुखा आणि ओला कचरा जमा करून घंटागाडी मध्ये द्यावा असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant