Breaking News
उल्हासनगरमधुन २६ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून कारवाई
उल्हासनगर - ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आज कडक कारवाई करत शहरातील २६ बोगस डॉक्टरांचे बिंग फोडले आहे. उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयात तक्रारदारांनी केल्या होत्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाही करणेकरीता प्रथम धडक मोहिम राबविण्यात आली होती.
२६ बोगस डॉक्टरांचा महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून यापैकी १८ बोगस डॉक्टरवर उल्हासनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, यांनी दिली आहे.
नागरीकांनी बेकायदेशीर डॉक्टरांकडून उपचार घेवू नये आणि संशयास्पद वैद्यकिय व्यवसायाबाबत त्वरीत प्रशासनाला कळवावे, असे आवाहन वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade