Breaking News
या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिला
महिला
मुंबई - HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’ नुसार, रोशनी आता ३.१३ लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे आहे.
रोशनीपूर्वी त्यांचे वडील शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्या नेतृत्वाखालील एचसीएल टेक्नॉलॉजी ही देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप ४.२० लाख कोटी रुपये आहे. आता त्यातील अर्ध्याहून अधिक हिस्सा शिव नाडर यांच्या मुलीकडे आहे.रोशनी या यूकेमधील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशनमध्ये पदवीधर आहे. त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएदेखील केले आहे. रोशनी यांनी ब्रिटनमधील स्काय न्यूजमध्ये निर्माती म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
रोशनी नाडर आता देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहेत. या बाबतीत त्यांनी सावित्री जिंदाल यांना मागे टाकले आहे, ज्यांच्याकडे २.६३ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. जिंदाल या पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे ७.७ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची संपत्ती सुमारे ६ लाख कोटी रुपये आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर