Breaking News
चीनमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मिळणार मोफत शिक्षण
बिजिंग - एकेकाळी सक्तीने लोकसंख्या नियंत्रण केल्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चीन आता देशातील लहान मुलांच्या विकासासाठी विविध योजना आणत आहे. लोकसंख्या वाढवण्याबाबत नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनच्या सरकारने नवे धोरण आखले आहे.आता चीनमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. सध्या फक्त ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत आहे.आता नवीन धोरणांनुसार शालेय फीचे पालकांवर आर्थिक भर टाकणार नाही. त्यामुळे लोकांना अधिक मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहन मिळेल.
चीनचे सरकारने नवजात बालकांना ३ वर्षांसाठी मोफत आरोग्य विमा देखील देणार आहे.त्यामुळे पालकांना मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक चिंता भासणार नाही.ग्रामीण भागात अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. २०२४मध्ये सलग तिसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या कमी झाली.सुमारे १३ लाखांनी चीनच्या लोकसंख्येत घट झाली.सध्या चीनची लोकसंख्या सुमारे १४०कोटी आहे. भारतानंतर चीन हा जगातील जास्त लोकसंख्या असणारा दुसरा देश आहे.२०२३मध्ये भारताने लोकसंख्या वाढीत चीनला मागे टाकले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर