Breaking News
या देशाच्या संसदेवर विरोधकांचा स्मोक ग्रेनेडने हल्ला
देश विदेश
बेलग्रेड - युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज स्मोक ग्रेनेड फेकले. सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आणि निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी हे निदर्शने केली. सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्याला मंजुरी देताच, काही विरोधी नेते त्यांच्या जागेवरून उठले आणि सभापतींच्या खुर्चीकडे धावले. त्यांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड फेकले, ज्यामुळे सभागृह काळ्या धुराने भरले. यादरम्यान, त्यांची त्याच्या सुरक्षा रक्षकांशी झटापटही झाली.
सर्बियन संसदेत आज देशातील विद्यापीठांसाठी निधी वाढवण्यासाठी एक कायदा मंजूर होणार होता. यासोबतच पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्यावरही चर्चा होणार होती. परंतु सत्ताधारी आघाडीने मांडलेल्या अजेंड्यावरील इतर मुद्द्यांमुळे विरोधक संतप्त झाले. यानंतर हा गोंधळ झाला. या हल्ल्यात दोन खासदार जखमी झाले असून, त्यापैकी एक, जस्मिना ओब्राडोविक, यांची प्रकृती गंभीर असल्याचे स्पीकर अॅना ब्रनाबिक यांनी सांगितले. सभापती म्हणाले की संसद आपले काम करत राहील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade