Breaking News
ऐकावं ते नवलच! अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेला बॉम्ब ८० वर्षांनी फुटला, विमानांना फटका
मुंबई - दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकन बॉम्बचा बुधवारी २ ऑक्टोबरला जपानच्या विमानतळावर अचानक स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण विमानतळावर गोंधळ उडाला. स्फोटामुळे टॅक्सीवेमध्ये मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे 80 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जपानच्या भूमी आणि वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा स्फोट अचानक झाला.
व्हिएशन स्कूलमधून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये हा अपघात दिसत आहे. स्फोटामुळे डांबराचे तुकडे कारंज्याप्रमाणे हवेत उडले. तर, टॅक्सीवेमध्ये खोल खड्डा दिसत आहे. त्यानंतर लगेचच जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितले की विमानतळावरील 80 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबाबत त्यांनी सांगितले की, एक दिवसानंतर ऑपरेशन पुन्हा सुरू होईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade