Breaking News
ब्राह्मण समाजासाठी स्थापना; पुण्यात मुख्यालय
Brahman Samaj Mahamandal : ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा केली. या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे. याचे मुख्यालय पुण्यात असणार आहे.
कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश
राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आज मंत्रीमंडळाने तिलोरीकुणबी, तिल्लोरी कुणबी, ति.कुणबी”यापोटजातींचा महाराष्ट्रशासनाच्या इतरमागासवर्ग यादीतीलअ.क्र.83 येथे समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. आयोगाच्या शिफारसीनुसार यापोटजातींचामहाराष्ट्रशासनाच्या“इतरमागासवर्ग”यादीतीलअ.क्र.83 येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे समावेश होईल.
राजपूत समाजासाठीवीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील.
राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण
राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्यात सध्या ४१९ शासकीय आणि ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यापैकी १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत.
यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव कै.विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, औ.प्र.संस्था जामखेड जि.अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जि. अहमदनगर, औ.प्र.संस्था मुंबई शहरचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था येवला जि.नाशिकचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र. संस्था जव्हार जि.पालघरचे नाव भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था कोल्हापूरचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था अमरावतीचे नाव संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांवचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था आर्वी जि.वर्धाचे नाव दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था बेलापूर नवी मुंबईचे नाव दि.बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र. संस्था कुर्लाचे नाव महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था भूम जि.धाराशिवचे नाव आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.ठाणेचे नाव धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठांच्या दरवर्षी देण्यात येणाऱ्या ठोक रक्कमेत दोन कोटींची वाढ करण्यात आली असून, प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी चार हप्त्यांत ही रक्कम देण्यात येईल. यापुर्वी ही रक्कम पाच कोटी इतकी होती. मात्र वाढती विद्यार्थी संख्या, देखभाल-दुरूस्ती, सुरक्षा यांचा वाढता खर्चा बघता हा निधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade