Breaking News
इराणमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात ५१ जण ठार
तेहरान - इराणमधील तबास जवळच्या एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ५१ जण ठार झाले आहेत. या खाणीत अद्यापही २० जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तबास या राजधानी तेहरानपासून ५४० किलोमीटर दूरवर असलेल्या दक्षिण खोरासन भागातील मडांजू खाणीत हा स्फोट झाला. खाणीमध्ये मिथेन वायुमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत असून खाणीच्या दोन भागात स्थानिक वेळेनुसार काल रात्री नऊच्या सुमारास हा स्फोट झाला.
या वेळी खाणीत एकूण ६९ कामगार काम करत होते. त्यातील ५१ जणांचा मृत्यू झाला असून इतर कामगार बेपत्ता झाले आहेत. या स्फोटात २४ जण बेपत्ता असल्याची माहिती इरानच्या रेड क्रेसेन्ट संस्थेच्या प्रमुखांनी इराणच्या टीव्हीवरून दिली आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर