Breaking News
बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘फुलवंती’ कादंबरीवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन
मुंबई -‘फुलवंती’ ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली साहित्यकृती लवकरच चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. प्राजक्ता माळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.या चित्रपटाचं संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे. ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात येत्या 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फुलवंती’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलंय. त्यात प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
यासोबतच, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर या मराठीतील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘फुलवंती’ चित्रपटात दिसणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant