Breaking News
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून X वर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश
ब्राझिलीया, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : X प्लॅटफॉर्मवर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. एलन मस्क यांनी ब्राझीलमधील आपल्या कायदेशीर प्रतिनिधीची माहिती न्यायालयाने दिलेल्या मुदतीत दिली नाही. दरम्यान, एक्स बॅन केल्यानंतर व्हीपीएनच्या माध्यमातून एक्सवर काम करण्याचा कुणीही प्रयत्न केल्यास त्या युजरला प्रत्येक दिवशी 7.5 लाख रुपये दंड लावण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित आदेशांचे पालन होईपर्यंत देशात एक्सवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश मोरेस यांनी दिले आहेत. यामध्ये 18.5 दशलक्ष रियास (सुमारे २७.६६ कोटी रुपये) दंड भरणे आणि ब्राझीलमध्ये कायदेशीर प्रतिनिधी नेमणे यांचा समावेश होता.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरेस आणि एलन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात ब्राझीलमधील सॅटेलाईट इंटरनेट प्रोव्हायडर स्टारलिंकची आर्थिक खाती गोठवण्याचा समावेश आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर मस्क यांनी एक्स पोस्ट केली आहे.
Apple आणि गुगलला ऑनलाईन स्टोअरवरुन एक्स ब्लॉक करण्यासाठी पाच दिवसांची मुदत मिळाली आहे. यासह इंटरनेट सेवा देणाऱ्यांना देखील एक्स ब्लॉक करण्यासाठी 5 दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे. न्यायमुर्तींनी त्यांच्या निर्णयात म्हटलं आहे की, ब्राझीलमध्ये सोशल मीडियावर बेकायदेशीर वातावरण तयार करण्यासाठी एक्स मदत करत आहे. यात 2024 मधील निवडणुका देखील आहेत. त्यांनी पुढे म्हटलंय की कंपनीनं वारंवार न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर