Breaking News
योगाचे निरोगी आयुष्यासाठी महत्त्व, ५ सोपे योगासने जी रोज करावीत
योग हे आरोग्य निरोगी घालविण्याचे एक विज्ञानच आहे. शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि माणसाचे शरीर आणि आत्मा सुखी राहण्यासाठी योगाचे महत्त्व आजही सांगण्यात येते.
‘युज’ या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द बनला आहे. मन आणि आत्म्याला एकत्र जोडणे म्हणजे योग असे म्हटले जाते. सिंधु घाटामधून याची सुरूवात झाली असा इतिहास आहे. वैदिक काळात एकाग्रता प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करण्यात यायचा.
शास्त्रीयदृष्ट्या प्रगत झाल्यानंतर शारीरिक मुद्रांना आणि श्वास घेण्याच्या या योगा पद्धतींना जोडून ध्यानधारणा आणि मनःशांतीसाठी वापरण्यात आले. आसन, शरीर आणि आत्मपरीक्षण, प्राणायाम या गोष्टींना योगामध्ये अधिक महत्त्व असल्याने निरोगी आयुष्य राहण्यास मदत मिळते. योगाचे आरोग्यासाठी नक्की काय फायदे होतात आणि निरोगी आयुष्यासाठी काय महत्त्व आहे जाणून घेऊया
योगाचे शरीरासाठी होणारे फायदे आणि महत्त्व
शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होतो. शरीर निरोगी, बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व असून योगाभ्यास केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते
मधुमेहासारख्या रोगासाठीही योग फायदेशीर ठरते आणि नियमित योगा केल्याने शुगर आटोक्यात राहण्यास मदत मिळते
ध्यानधारणा केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते आणि मन अधिक शांत होते. चिडचिड होत नाही
गॅसची समस्या अथवा पचनशक्तीचा त्रासही योगासनांमुळे निघून जातो आणि शरीर अधिक निरोगी राहाते
वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त फायदा योगाचा होता. योगाचे महत्त्व तुम्ही जाणून घेतले तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित याचा उपयोग करून घेऊ शकता
वयापेक्षा अधिक तरूण दिसण्यासाठीही योगा फायदेशीर ठरते. योगामुळे तणाव येत नाही आणि यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसत नाहीत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे