ब्रिटनमधील लीडस शहरात जमावाकडून जाळपोळ आणि हिंसाचार
ब्रिटनमधील लीडस शहरात जमावाकडून जाळपोळ आणि हिंसाचार
लीड्स - ब्रिटनमधील लीड्स शहरात काल अचानक किरकोळ कारणाने हिंसाचार उफाळून आला. हिंसक जमावाने जागोजागी आगी लावल्या. एक डबल डेकर बस आणि पोलिसांची गाडीही पेटवली. ब्रिटिश मीडिया आउटलेट मिररच्या मते, एजन्सी मुलांना त्यांच्या पालकांकडून ताब्यात घेत होती आणि त्यांना बाल देखभाल गृहात पाठवत होती. याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले.
यावेळी जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग लावली. पोलिसांच्या एका वाहनाच्या खिडकीच्या काचा फोडल्या.नंतर ते वाहन उलटून टाकले व या वाहनाला आग लावली. जमावाने अनेक वस्तू रस्त्यावर आणून त्यांना आगी लावल्या. जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी जमावाला शांत करून आपापल्या घरी जाण्याची विनंती केली. साडेदहा वाजता हिंसाचार थांबवल्यानंतर पोलिसांच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने टेहाळणी करण्यात येत होती. या जाळपोळीत कोणी जखमी झाले नसल्याचे यॉर्कशायर पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार 5 वाजता लीड्सच्या हरेहिल्स भागातील लक्सर स्ट्रीटवर लोकांची गर्दी जमू लागली. यानंतर काही वेळातच जमाव चिडला. या गर्दीत लहान मुलांचाही समावेश होता. पोलिस हेलिकॉप्टरमधून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आजूबाजूचे लोकही त्यात सामील झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता परिस्थिती सामान्य झाली आहे. मात्र लोकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant