मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाघ नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाघ नखे भारतात आली आहेत. सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथून खास विमानाने मुंबई येथे सकाळी दाखल झाली. त्यानंतर ही वाघनखे सातारा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत .

या वाघनख्यासाठी बुलेटप्रूफ काचेची पेटी तयार करण्यात आलेली असून सीसीटीव्ही कॅमेरे आणि अद्यावत सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे. 19 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत .

कस्टम विभागाचे अधिकारी आणि सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात लंडनहून आलेली वाघ नखे साताऱ्याकडे नेली जात आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजता ही वाघ नखे दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही वाघ नखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही वाघ नखे साताऱ्यासाठी रवाना झाली आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट