Breaking News
उ. कोरियाच्या हुकूमशाहाकडून ३० अल्पवयीन विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या
देश विदेश
प्योंगयांग -आधुनिक काळातील या जगात व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मानले जात असतानाही जगातील काही देशांतील नागरिक अद्यापही क्रुर हुकुमशाहीतचे बळी ठरत आहेत. माणसाच्या प्राणांचे शून्य मोल असलेले हे हुकुमशहा आपल्या आदेशाचा भंग करणाऱ्यांना अक्षरश: पायदळी तुडवताता याचे एक गंभीर वास्तव उघडकीस आले आहे, उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा (Korean Drama) बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.
हुकुमशाह किम जोंग उनच्या (Kim Jong Un) सरकारने के-ड्रामा (K-Drama) पाहिल्याने 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे. किम जोंग उनच्या आदेशावरुन 30 विद्यार्थ्यांना (Students) भरचौकात गोळ्या घालण्यात आल्याची माहिती मिडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. कोरियन वृत्तपत्र ‘जोंगआंग डेली’च्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, ज्याचा माहिती आता समोर आल्याचं सांगितलं जात आहे.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये तणाव सर्वज्ञात आहे. हुकुमशाह किंग जोंग उनने (Kim Jong Un) उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा (Korean Drama) पाहण्यास बंदी घातली आहे. तसेच, उत्तर कोरियामध्ये यूट्यूब (YouTube) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही (Social Media Platform) बंदी आहे. येथे फक्त रशियन सिनेमा आणि सरकारमान्य काही वेबसाईटवर वापरता येतात. इतर सर्व चित्रपट आणि नाटक तसेच गाणी ऐकण्यावरही बंदी आहे.
उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या हुकुमशाही सरकारने दक्षिण कोरियातील नाटक (K-Drama) आणि चित्रपट पाहण्यास बंदी घातली आहे. दक्षिण कोरियन नाटक पाहिल्याच्या कथित आरोपा खाली 30 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 30 शालेय विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्याचं दक्षिण कोरियातील मीडिया आउटलेट्स चोसून टीव्ही आणि कोरिया जोंगआंग डेलीने ही बातमी दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं वय 19 वर्षांखालील होतं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant